थोरले शाहू महाराज आणि वाघाचा हल्ला

छत्रपती थोरले शाहू महाराजांना(सातारा) प्राण्यांची शिकार करण्याची आणि पाळीव प्राण्यांची देखील प्रचंड आवड होती असे अनेक पत्रांवरून दिसते. साताऱ्यास त्यांचा शिकारखानाही समृद्ध होता, त्यात बरेच प्राणी होते.

Tiger attack on Chhatrapati Shahu Maharajशाहू महाराज एकदा पंढरपूर भागात गेले असता तिथे त्यांनी वाघाच्या शिकारीला जायचे ठरवले, सोबत अनेक सहकारी होते, या सहकाऱ्यांमध्ये साखरोजी यादव हा तरुण नोकर सोबतीला होता. शिकारी दरम्यान वाघाचा हल्ला झाला आणि तो त्यात मारला गेला. 

या दुर्दैवी घटनेनंतर शाहू महाराजांनी इ.स. १७३७ मध्ये त्याच्या वडलांना म्हणजेच केदारजी पाटील यांस कऱ्हाड प्रांतातील नाणेघोल गावातील ५ बिघा जमीन इनाम म्हणून दिली. शाहू महाराजांनी ,आपल्या सहकाऱ्यांनी दिलेले योगदान लक्षात ठेवून त्याची परतफेड करण्याची वृत्ती आणि वारसा छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच घेतला असावा असे म्हणता येईल. 


संदर्भ : श्री छत्रपती शाहू महाराज यांची रोजनिशी भाग १ 
- गणेश चिमणाजी वाड, द.बा. पारसनीस

- रोहित पवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा