१३७५ रुपयात कोथरूड मध्ये घर
आजकाल सगळीकडेच घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत,पुणे शहरही त्याला अपवाद नाही. शिवकाळात किंवा पुढे पेशवाईत, कोथरूड हा भाग खरं तर पुण्याबाहेरचा मानला जात असे. भांबुर्डा (शिवाजीनगर) आणि इतर पेठा या मध्यवर्ती होत्या. पण कालांतराने कोथरूड भागास प्रचंड महत्व प्राप्त झाले आणि आज कोथरूड हा उच्चभ्रू वस्तीचा परिसर बनला आहे. आज इथल्या घरांच्या किमती साधारणपणे करोडच्या पटीत आहेत.
इ.स. १७८५ साली इथे एका घराची विक्री झाली तेव्हा १३७५ रुपयांना हा व्यवहार झाला होता. या व्यवहारात सदर जमीन त्यासोबत इमला (घर) आणि विहीर असे खरेदीखत झाले. त्यातही या व्यवहारात सुरवातीला ६०% आणि नंतर ४०% पैसे दिले गेले. रामराव बिलवलकरांनी हे घर नाईक कुटुंबास विकले.
आणखी बरेच उल्लेख आहेत जसे की, पुण्यातल्या गुरुवार पेठेत (रुंदी - साडे आठ गज चार तसु आणि लांबी सोळा गज तीन तसु ) या जमिनीवर बांधलेले घर असा व्यवहार १५०० रुपयांना झाला. सदर घटना १७७० ची आहे.
तसेच १७७७ मध्ये तुळशीबागेजवळचे एक घर स्वखुशीने २०० रुपयांना विकले अशा नोंदी आपल्याला इतिहासात आढळतात.
संदर्भ :
पुणे नगर संशोधन वृत्त इस.१९४२
संपादक : चिं. ग. कर्वे ,
प्रकाशक : भारत इतिहास संशोधक मंडळ
- रोहित पवार
संपादक : चिं. ग. कर्वे ,
प्रकाशक : भारत इतिहास संशोधक मंडळ
- रोहित पवार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा