सुरत लुटीचे डॅमेज कंट्रोल


इस १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. या लुटीत अगणित द्रव्य महाराजांना लाभले. दुसरीकडे या घटनेने औरंगजेबाचा तिळपापड उडाला होता. खरंतर सुरतेतून मिळणारं उत्पन्न औरंगजेबाच्या बहिणीला (जहांआरा बेगम) मिळण्याची व्यवस्था औरंगजेबाने केली होती. त्याकाळी सुरत व्यापाराची राजधानी होती परंतु शिवाजी महाराजांच्या दणक्याने अनेक व्यापारी सुरत सोडून चालले होते.




यावर तोडगा म्हणून औरंगजेबाने मोठ्या उदारपणे एक वर्षभर इंग्रजांना व इतर सर्व व्यापाऱ्यांना जकात माफ करण्याचा हुकुम काढला. एवढेच नाही तर पुढेही एक चतुर्थांश जकात दरसाल माफ होईल असे संकेत दिले. (बंगालला लिहलेल्या ३० एप्रिल १६६४ च्या पत्रात "आपल्या शहरांतील व्यापाऱ्यांना उत्तेजन मिळावे व झालेल्या नुकसानीची भरपाई व्हावी म्हणून एक वर्षाच्या जकाती औरंगजेबाने माफ केल्या असे लिहले आहे")


संदर्भ - शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ लेखांक ९८७
No comments

No comments :

Post a Comment