गोष्टी इतिहासकरांच्या !


२० व्या शतकात इतिहासकरांनी राष्ट्रसेवेच्या उद्देशाने इतिहास संशोधनात मोलाची कामगिरी केली. परंतु इतिहास म्हणले कि वाद विवाद आलेच. अशीच हि गोष्ट आहे सरदेसाई आणि शेजवलकर यांच्यातील.बडोद्याच्या 'भारत गौरव ग्रंथमाला' च्या संपादकांनी भारतातील कर्तुत्ववान व्यक्तींची चरित्रे लिहावयाचा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी सरदेसाईंना नानासाहेब पेशव्यांचे चरित्र लिहायची विनंती केली.


सरदेसाईंनी ते चरित्र लिहण्याचे मान्य केले. त्यांची मराठी रियासत संपादित असल्याने त्यांच्यासाठी हे नवीन काम नव्हते. पण तरीही नव्याने लिहलेल्या पुस्तकाचे संपादन एका तरुण अभ्यासकाला दिले. ते तरुण म्हणजे त्र्यं.शं. शेजवलकर. शेजवलकरांचा पेश्व्यांबद्दलचा दृष्टीकोन सरदेसाईंच्या अगदी विरुद्ध होता. सरदेसाईंना हि गोष्ट चांगली माहित होती.सरदेसाईंची अशी धारणा होती कि या मतमतांतरामुळे लोकांना स्वतःची मते मांडावीशी वाटतील, ऐतिहासिक लेखन करण्यास लोक प्रवृत्त होतील. म्हणून नानासाहेबांच्या त्या चरित्रात शेजवलकरांनी लिहलेल्या टीकात्मक प्रस्तावनेचा पुस्तकामधे मुद्दाम समावेश सरदेसाईंनी केला.


त्याकाळात इतिहासकरांचे वाद कधी कधी विकोपालादेखील जात, परंतु इतिहासात चांगली सुधारणा हा त्यामागील हेतू स्पष्ट होता. स्तुती आणि टीका या दोन्ही गोष्टींचा स्वीकार करण्याची बुद्धी आणि मनाचा मोठेपणा काय असतो याचे सुंदर उदाहरण म्हणजे सरदेसाई.

No comments

No comments :

Post a Comment