shivaji लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
shivaji लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
२०१७ साली कामानिमित्त लंडनला जाणे झाले. इतिहासाचा विद्यार्थी असल्याने पावलं म्युझिअम कडे वळणार होतीच. इथे व्हिक्टोरिया अल्बर्ट या अतिशय प्रसिद्ध अशा वास्तुसंग्रहालयाला भेट दिली . इथे ज्या काचेच्या कपाटात छत्रपती शिवरायांची वाघनखं ठेवली आहेत तिथेच ठेवली आहे आणखी एक महत्वाची वस्तू - औरंगजेबची तलवार.
इस १६८० सालची स्टीलचं पातं असलेली ही सुंदर तलवार सोन्याच्या जाडसर नक्षीने मढवली असून त्यावर फारसी लिखाणही आढळते. त्यावर 'आलमगीर पादशाह २४ या रहमान या रहीम '' असे लिहले असून २४ हा आकडा त्याचा इस १६८० (हिजरी सन १०९१) सालातील औरंगजेबचा शासनकाळ दर्शवतो असा तर्क मांडला गेला आहे.
सदर तलवारीच्या पात्यांचे नक्षीकाम पाहता सतराव्या शतकातील सुप्रसिद्ध तालवारींचा निर्माता असादुल्लाह इसफाहानी याने ही तलवार बनवली असल्याचे मानले जाते. फिल्ड मार्शल अर्ल किचनर यांच्या कलेक्शन मध्ये असलेली ही तलवार पुढे १९६४ साली या संग्रहालयात आणली गेली.
- रोहित पवार
लंडनमधील औरंगजेबची तलवार
मराठा स्वराज्याचे सरखेल, आरमार प्रमुख 'कान्होजी आंग्रे' यांनी परकीय सत्तांना शह देत समुद्रावर सत्ता गाजवली. काही वर्षांपूर्वी मराठ्यांच्या लहान बोटींना नावं ठेवणारे इंग्रज पुढच्या काळात मराठ्यांसारखी जहाजे आपल्याकडे असायला हवीत असं म्हणायला लागले. यातच मराठ्यांच्या आरमाराचे यश दिसून येते.
या कान्होजी आंग्र्यांवर इंग्रज गव्हर्नर फिप्सने चाचेगिरीचा (pirates) आरोप केला, यावर कान्होजी आंग्रे यांनी अगदी समर्पक असे प्रत्युतर दिले ते वाचण्यासारखे आहे .
" दुसऱ्याच्या मालकीची वस्तु आपल्या अधीन करुन घेण्याच्या बाबतीत म्हणायचे तर, असल्या महत्वकांक्षा आपणासारख्या व्यापार्यांनी बाळगल्या नाहित का? जगाचा शिरस्ताच आहे, परमेश्वर स्वतःचे असे काहिच देत नसतो. तो एकाचे काढून दूसर्याला देतो. परमेश्वराची ही कृती चांगली कि वाईट हे कोण ठरवनार ? एक विविक्षित राजसत्ता ही हिंसा, अपमान आणि चाचेगिरी (piracy) याच्यावर चालली आहे असे म्हणणे तुमच्यासारख्या व्यापार्यांना आजिबात शोभत नाही. व चार पातशाह्यांशी झुंज देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले तेव्हा याच गोष्टीचा त्यांनी अवलंब केला. आम्ही त्याच पद्धतीने सत्तेवर आहोत. खरेखोटे मानो अथवा न मानो त्यामुळेच आम्ही टिकून आहोत."
संदर्भ : दर्याराज कान्होजी आंग्रे - सदाशिव शिवदे
मुळ संदर्भ : Consultation Bombay Castle 7th august 1724
- रोहित पवार
आंग्र्यांचे इंग्रजाना उत्तर
शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत रोमांचक प्रसंग म्हणजे 'आग्रा भेट'. शिवाजी महाराजांचे विश्वसनीय आणि समकालीन चरित्र म्हणजे 'शिवभारत' आणि या ग्रंथाचे रचयिते 'कवींद्र परमानंद' हे आग्रा प्रकरणात उपस्थित असल्याची राजस्थानी पत्रव्यवहारात नोंद आढळते.
त्या 'डिंगल' भाषेतील पत्राचा मराठी अनुवाद असा - "शिवाजीराजांसोबत त्यांचा एक कवी आहे 'कवींद्र कवीश्वर' ,शिवाजीराजांनी त्याला एक हत्ती , एक हत्तीण , एक हजार रुपये रोख, एक घोडा आणि पोशाख दिला. यासोबतच शिवाजीराजांनी अजून एक हत्ती देण्याचे वचन त्याला दिले आहे आणि ते वचन लवकरच पूर्ण करतील."
---------------------------
"Shivaji has a poet entitled 'kavindra kavishwar', to whom he gave male elephant, female elephant, one thousand rupees in cash, a horse & full suit. He promised to give one more elephant to the poet & he is going to give it."
---------------------------
या पुस्तकाचा परिचय जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
शिवभारतकार परमानंद आणि आग्रा भेट
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)