Showing posts with label Ahamad Shah Abdali. Show all posts
Showing posts with label Ahamad Shah Abdali. Show all posts
पानिपतचे महायुद्ध झाले ते अफगाणी अहमदशहा अब्दाली आणि मराठा सदाशिवराव भाऊ यांच्यात. 'अहमदशहा अब्दाली' वयाच्या १६ व्या वर्षीपासूनच इराणचा बादशहा 'नादिरशहाचा' गुलाम होता. नादिरशहाची त्यावर मर्जी होऊन तो लवकरच 'यसवाल' (वयक्तिक अधिकारी) झाला.
पुढे १७३९ साली नादिरशहाने दिल्लीवर स्वारी केली त्यावेळी अब्दालीदेखील त्याच्यासोबत होता. या दरम्यान मुघलांचा दक्खनेतील सुभेदार असलेल्या 'निजाम-उल-मुल्कची' नजर या अब्दालीवर पडली. मुखसामुद्रिक (Facereading) अवगत असणाऱ्या निजाम-उल-मुल्कने भाकीत केले कि, "अब्दालीच्या शरीरावर राजलक्षण आहेत, हा लवकरच बादशहा होईल" ! बादशहा नादिरशहाने हे ऐकल्यावर अब्दालीला बोलवून कट्यारीने त्याच्या दोन्ही कानांचा तुकडा काढला आणि म्हणाला , " तू बादशहा झालास कि यामुळे तुला माझी आठवण होत राहील".
संदर्भ :
*Solstice at Panipat -Uday Kulkarni, P28
*Ahmad Shah Durrani - Ganda Singh , P19
* मूळ संदर्भ तारीख-इ-अहमदशाही 2b
*Solstice at Panipat -Uday Kulkarni, P28
*Ahmad Shah Durrani - Ganda Singh , P19
* मूळ संदर्भ तारीख-इ-अहमदशाही 2b
(कुरूप) अहमदशहा अब्दाली
Subscribe to:
Posts
(
Atom
)